![]() |
थोडेसे आडवाटांवर भटकायला लागल्यावर अजस्त्रकड्याच्या उदरात दडलेली लेणी भेटतात आणि अजून अशी किती अदभुत रहस्य या सह्याद्रीच्या उदरात दडून राहिलीयेत याचा विचार करायला भाग पडते. |
तब्बल एक
महिना सक्तीची विश्रांती झाली आणि परत एकदा वेध लागले ते ट्रेकचे. कुठे जायचे? यावर चर्चासत्र सुरु झाली आणि 'या
विकेंडला सगळीकडे कुत्र्यासारखा पाऊस आहे व कुत्र्यागत काम आहे रे' असे बोल ऐकू येऊ लागले. एरवी वाढत जाणाऱ्या भारताच्या लोकसंख्येला ट्रेकचा
विषय निघाला कि गळती लागते हे खरेच न उलगडणारे कोडे आहे, यावेळेसही
तसेच झाले. अखेरीस 'इन-मीन-तीन' जण
तयार झाले आणि 'तीन तिघाड काम बिघाड' न
होता रात्री उशीरा प्लॅन पक्का झाला.